अखेर करिनाने जाहीर केले शाहिद सोबत लग्नाला दिलेल्या नकाराचे कारण.. छोटा होता म्हणून..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो असतो. आणि जर बॉलिवूड मधील च दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.

आताच्या काळात जरी अशा घटना कमी झाल्या असतील तरी मागील दशकात मात्र असे प्रकरण सर्रास समोर येत असत. असे अनेक कलाकारांचे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते ज्यांनी तेव्हा जगासमोर मान्य नाही केलं.. परंतु आता काही वर्षांनी हे प्रकरण उघडकीस येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला मागील दशकातील अशाच एका जोडप्याबद्दल सांगणार आहोत जे बॉलिवूड मधील सर्वात लाडके कपल म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होते. आणि ते दोघे एकमेकांसोबत लग्न करतील अशीही सगळ्या चाहत्यांना खात्री होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही आणि दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. आम्ही बोलत आहोत करीना आणि शाहिद कपूर बद्दल.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या एका चॅट शोमध्ये शाहिदने एक धक्कादायक खुलासा केला. तोसुद्धा आपल्या लग्नापूर्वीच्या रिलेशनशिपबद्दलचा. ‘इशारों इशारों’मध्ये शाहिद कपूर आपल्या ‘एक्स’बद्दल बोलून गेला. शोमध्ये नेहा धूपियाने शाहिदला त्याच्या लव्हलाईफबद्दल विचारले. तू कधी तुझ्या को-स्टारच्या प्रेमात पडला आहेस का? असा प्रश्न नेहाने शाहिदला विचारला

हा प्रश्न शाहिद शिताफीने टाळणार, असे वाटत असतानाच त्याने याला होकारार्थी उत्तर दिले. शाहिद म्हणाला, ”होय, एकदा नाही तर दोनदा मी माझ्या को-स्टारच्या प्रेमात पडलो. यापैकी एक तर आजही खूप लोकप्रिय आहे. पण तिने मला धोका दिला.” आता शाहिदचा इशारा कुणाकडे होता, हे तुम्ही समजू शकता

त्याचा इशारा कदाचित करीना कपूरकडे होता. शाहिद आणि करीनाच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. मीरासोबत लग्न करण्यापूर्वी शाहिद तीन वर्षे करीनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांची लव्ह स्टोरी ‘फिदा’ (2004) या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. करीनानेच शाहिदला प्रपोज केले होते.

करीना आणि शाहिदची पहिली भेट ‘फिदा’ (2004) चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शाहिदला पाहून करीना एवढी इम्प्रेस झाली होती, की तिनेच शाहिदला प्रपोज केले होते. करीनाने स्वतः काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ही बाब मान्य केली होती. करीनाने सांगितले की, अनेकदा फोन आणि मॅसेज केल्यानंतर शादिहने तिचे प्रपोजल स्वीकारले होते.

स्क्रीनवर दोघांच्या जोडीला काही कमाल करता आली नाही, पण त्यांच्या लव्ह लाईफची चांगलीच चर्चा झाली होती. करीनाने 2000 मध्ये डेब्यू केला होता. तर शाहिदने 2003 मध्ये. 2004 मध्ये फिदा या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी करीना यशस्वी अॅक्ट्रेस समजले जात होते, तर शाहिदने नुकतेच पदार्पण केले होते.

काही वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांचा सार्वजनिक ठिकाणी स्मू-च करतानाचा एम-एम-एससुद्धा व्हायरल झाला होता. हे दोघे एकेकाळी प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते, की आपण सार्वजनिक ठिकाणी लिप-लॉ-क करतोय, याचे साधे भानही त्यांना राहिले नव्हते. अनेक ठिकाणी ही जोडी हातात हात घालून एकत्र दिसायची.

अनेक खास क्षण या दोघांनी सोबत घालवले आहेत. एकदा हे दोघे एका बीचवर रोमान्स करतानासुद्धा दिसले होते. परंतु नंतर मात्र दोघांमध्ये काही वादविवाद झाले. आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार करिनाने शाहीदला धोखा दिला कारण शाहिद तिच्यापेक्षा वयाने छोटा होता. दोघांमध्ये 4 वर्षांचं अंतर होतं. अभिनेत्री करीना कपूर आता सैफ अली खानची बेगम असून आनंदाने आपले वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहे.

तर तिचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता शाहिद कपूरनेही दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत लग्न थाटले. करीना आणि शाहिद हे दोघेही आता आपापल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. सैफ-करीनाला तैमूर हा मुलगा तर शाहिद-मीराला मिशा ही एक मुलगी आहे.