Partner पासून वेगळं होणं म्हणजे….; विश्वासघात करून ‘तो’ पुढे गेला… ‘ही’ गायिका मात्र पुरती खचली

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर शकिरा (Pop Singer Shakira) आणि स्पॅनिश सॉकर प्लेअर जिरर्ड पिक (Spanish Soccer Player Gerard Pique) आता एकमेकांपासून वेगळे झाले. गेली 11 वर्षे ते दोघं एकत्र होते आणि त्यांना मिलान आणि साशा ही दोन मुलं आहेत. या वर्षी जूनमध्येच ते दोघं वेगळे झाले. (pop singer shakira opens up about her marriage and getting seperated with gerard pique see what she says)

हे सेपरेशन शकिरासाठी सोप्पं नव्हतं याची कबूली तिनं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतून दिली आहे. त्यात ती म्हणाली की, ‘आमच्या दोघांच्या सेपरेशनबद्दल बोलणं हे माझ्यासाठी फार कठीण आहे आजही माझ्यासाठी ते अवघड आहे. आज मी सार्वजनिक जगात वावरते त्यामुळे आमचं हे वेगळं होणं साधं नाहीये. आणि जे माझ्यासाठी फार सोप्पं नव्हतं आणि माझ्या मुलांसाठीही’, अशी माहिती तिनं नामवंत मॅगझीनसाठी देताना दिली. 

आपल्या घटस्फोटाबद्दल जितकं बोलणं कठीण आहे तितकंच शकिरासाठी तिच्या मुलांनाही याबद्दल सांगणं किंवा त्यांना खासकरून मीडियापासून लांब ठेवणं तसं बरंच कठीण आहे. याबद्दलही शकिरानं खुलासा केला आहे. ती म्हणाली, ‘माझ्याभोवती आणि माझ्या घराभोवती फोटोग्राफर्सचं जाळं पसरलेलं आहे. ते सतत माझ्यामागे असतात. 

त्यातून मला त्यांच्यापासून स्वतःला आणि मुलांना लांब ठेवणं कठीण जातं. मला याची सतत काळजी वाटतं असते. या फोटोग्राफर्समुळे मला माझ्या मुलांना घेऊन कुठे पार्कमध्ये किंवा आईस्क्रीम खायला घेऊन जायलाही जमत नाही त्यामुळे अशा प्रकारे जगणं माझ्यासाठी फार कठीण आहे.’

शकीरा ही सुप्रसिद्घ पॉप सिंगर आहे. तिला आजपर्यंत अनेक नामवंत पुरस्कार मिळाले आहेत. तिचं फिफा वर्ल्ड कपचं ‘वाक्का वाक्का'(Shakira Wakka Wakka Song)हे गाणं खूपच जास्त पॉप्यूलर झालं होतं.