अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा.. ‘सलमानने रात्री अपरात्री माझ्या घरी येऊन मजा केली.. पण लग्नाचा विषय काढताच’..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो असतो. आणि जर बॉलिवूड मधील च दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.

आताच्या काळात जरी अशा घटना कमी झाल्या असतील तरी 1990 च्या दशकात मात्र अशे प्रकरण सर्रास समोर येत असत. असे अनेक कलाकारांचे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते ज्यांनी तेव्हा जगासमोर मान्य नाही केलं.. परंतु आता काही वर्षांनी हे प्रकरण उघडकीस येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला 90 च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने नुकताच एक असा किस्सा सांगितलं आहे ज्यातून तिच्या तेव्हा सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आणि ज्या व्यक्तीवर त्या अभिनेत्रीचे प्रेम जडले होते, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान आहे.

आम्ही बोलत आहोत 90च्या दशकातील एक अतिशय खास व लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी बद्दल. आपल्या सडपातळ फिगरमुळे कायम चर्चेत असणारी शिल्पा, आपल्या पदर्पणापासूनच लोकप्रिय राहिलेली आहे. तिने अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे, त्यातल्या काहींसोबत शिल्पाचे नावही जोडले गेले होते.

परंतु शिल्पाने मात्र कधी ही गोष्ट लोकांसमोर मान्य नाही केली. परंतु तिने नुकताच एका खाजगी मुलाखतीत असा काही खुलासा केला आहे ज्यातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडची एकेकाळची सर्वात सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लग्नाला आता 11 वर्षे झाली आहे आणि ती तिच्या आयुष्यात खूप सुखी आहे.

परंतु लग्नाच्या बर्याच वर्षांनंतर तिने आता चुकून असे काही विधान दिले आहे ज्यातून दिसून येतंय की तिचे सलमान खानसोबत अतिशय खास संबंध होते. 1990 च्या दशकात शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांच्यातील नात्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. असं म्हटलं जातं होतं की दोघेही एकमेकांना खूप आवडतात परंतु दोघांनीही कधी या गोष्टीचा जनतेसमोर खुलासा नाही केला.

असे म्हटले जाते की एका चित्रपटाच्या चित्री करणाच्या सेटवर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते परंतु यापुढे दोघांनीही कधीच उघडपणे या गोष्टीची वाच्यता नाही केली आणि दोघेही एकत्र जास्त कधी दिसले नाहीत. पण आता शिल्पाने एक असे मोठे विधान केले आहे ज्यातून तिचे सलमान खानसोबतचे रिलेशनशिप कसे होते याची एक चुणूक दिसून आली.

शिल्पा शेट्टी यांनी तिचे जुने दिवस आठवत सलमानबद्दल सांगितले की सलमान खान माझ्या घरी नेहमी मला भेटायला यायचा आणि अनेकवेळा रात्री घरी माझ्याच घरी रहायचा. यादरम्यान सलमान शिल्पाच्या वडिलांसोबत बसून गप्पा मारायचा.

यासह शिल्पा शेट्टी असेही म्हणाली की जेव्हा सलमान खान त्याच्या घरी यायचा तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र मजा करायचो. सलमान खानबरोबरचे नाते कुटूंबासारखे झाले होते. सलमान हा शिल्पा च्या वडिलांसोबत म-द्य-पान देखील करायचा त्यामुळे तो पप्पांच्या अगदी जवळचा होता. आणि आमचा कुटुंबातील सदस्यच वाटत होता.

शिल्पाने असेही म्हटले आहे की मला आठवते की जेव्हा माझ्या वडिलांचा मृ-त्यू झाला तेव्हा सलमान खान माझ्या घरी आला होता. त्यावेळी वडिलांची बॉडी त्याच टेबल वर ठेवली होती जिथे दोघेही बर्‍याचदा मद्य-पान करत असत. सलमान माझ्या वडिलांना खूप मिस करत होता, म्हणून सर्व काही आठवल्यानंतर तो खूप रडत होता.

शिल्पा शेट्टी सलमान खानबद्दल खूपच गंभीर होती. परंतु सलमान ला मात्र लग्नाच्या भानगडीत पडायचे नव्हते. असं देखील ऐकण्यात आले आहे की शिल्पा ने सलमान ला लग्नासाठी विचारलं होतं ओरन्तु तेव्हापासून सलमान ने शिल्पापासून दूर राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे जेव्हा शिल्पाला कळून चुकलं की त्यांच्या या नात्याचं काही भविष्य नाही आहे, तेव्हा तिने सलमान खान सोडले आणि राज कुंद्राशी लग्न केले.