अरेच्चा.. ब्लाऊज घालायलाच विसरली अभिनेत्री शिल्पा शेट्टी ? व्हिडीओ होतोय व्हायरल..

चाळीशीची शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या ‘हंगामा 2’ (Hungama 2) या सिनेमामुळं चर्चेत आहे. पण सध्या चर्चा आहे ती तिच्या व्हिडीओची. होय, या व्हिडीओमुळं शिल्पा चांगलीच ट्रोल होतेय. व्हिडीओ आहे ‘हंगामा 2’च्या एका प्रमोशनल इव्हेंटचा.

या इव्हेंटमध्ये शिल्पाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. पण तिचा हा बोल्ड अवतार पाहून सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.  शिल्पा तू ब्लाऊज घालायला विसरलीस का?  असा सवाल करत काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. ( Shilpa Shetty gets troll for wearing bold dress)

व्हिडीओत शिल्पासोबत अभिनेता मिजान जाफरीही दिसतोय. व्हिडीओत शिल्पा सुरुवातीला बॅकग्राऊंड डान्सरसोबत बोलताना दिसते आणि यानंतर ती आत जाते. इथे क्रू मेबर्स शूटींगबद्दल चर्चा करताना दिसताना.

तुला पुन्हा एन्ट्री घ्यावी लागेल, असे शिल्पाला सांगण्यात येते आणि यादरम्यान शिल्पाचा एक वेगळाच अवतार दिसतो. तिचा ब्राऊन कलरचा ड्रेस लक्ष वेधून घेतो.

शिल्पाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शिल्पाच्या ग्लॅमरस लुकचं कौतुक केलं. पण अनेकांनी तिला ट्रोल केलं. काही युजर्स तिला बॉलिवूडची किम कदार्शियन म्हटलं.

ब्लाऊज घालायला विसरलीस का? इतके पैसे असून काय फायदा? तुझ्या अंगावर पुरेस कपडे देखील तुज्या अंगावर नाहीत, अशा शब्दांत काही युजर्सनी तिची खिल्ली उडवली. 

हंगामा 2  हा चित्रपट ‘हंगामा’ फ्रेंचायझीचा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये अक्षय खन्ना, परेश रावल, आफताब शिवदासानी, रिमी सेन   मुख्य भूमिकेत दिसले होते. आता काही जण वगळता नव्या चेह-यांसोबत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अक्षय खन्ना या चित्रपटात एक कॅमिओ करताना दिसणार आहे. येत्या 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होऊ घातलेल्या या सिनेमात शिल्पानं परेश रावल यांच्या ग्लॅमरस पत्नीची भूमिका साकारली आहे.

.