90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सध्या काय करतेय, लेटेस्ट फोटो झाले व्हायरल

अशा अनेक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये पाहिल्या आहेत, ज्यांनी शानदार पद्धतीने पदार्पण केले आणि नंतर अचानक इंडस्ट्रीतून गायब झाल्या. आज या लेखात आपण ९० च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने फार कमी वेळात खूप नाव कमावले होते पण नंतर अचानक इंडस्ट्रीतून ती गायब झाली. खरं तर आम्ही बोलतोय ती अभिनेत्री शिल्पा शिरोडकरबद्दल.

शिल्पाने 1989 मध्ये रमेश शिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून पदार्पण केले, तरीही तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. यानंतर ती ‘किशन कन्हैया’ चित्रपटात दिसली आणि रातोरात ती स्टार बनली. या चित्रपटाच्या यशानंतर तिच्या माघे चित्रपटांची ओढ लागली आणि ती गोपी किशन, रघुवीर, आँखे आणि सनम बेवफा या चित्रपटांमध्ये दिसली.

एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. ज्यानंतर तिचे चाहते खूप आश्चर्यचकित झाले आणि दु:खीही झाले. खरं तर, या सुंदर अभिनेत्रीने 2000 मध्ये ब्रिटनमधील सुप्रसिद्ध बँकर अपरेश रणजीतशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी चित्रपटांना कायमचा अलविदा केला होता. लग्नाच्या अनेक वर्षांनी ती पुन्हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत परतली. मात्र तिचे पुनरागमन अपेक्षेप्रमाणे झाले नाही.

20 नोव्हेंबर 1973 रोजी मराठी अभिनेत्री गंगूबाई यांच्या पोटी जन्मलेली शिल्पा ही अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया नम्रता शिरोडकर यांची धाकटी बहीण आणि मीनाक्षी शिरोडकर यांची नात आहे. अभिनेत्री शिल्पा 2000 मध्ये ‘गजा गामिनी’मध्ये दिसली होती. यानंतर 2010 मध्ये तिने ‘बारूद: (द फायर)- एक लव्ह स्टोरी’मध्ये काम केले होते, परंतु तिचा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.