जेव्हा ‘या’ अभिनेत्रीच्या विधानाने माजली होती खळबळ..’अक्षयने मला अनेक वेळा वापरून वाऱ्यावर सोडून दिले’

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो असतो. आणि जर बॉलिवूड मधील च दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.

अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.आताच्या काळात जरी अशा घटना कमी झाल्या असतील तरी 1990 च्या दशकात मात्र अशे प्रकरण सर्रास समोर येत असत. असे अनेक कलाकारांचे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते ज्यांनी तेव्हा जगासमोर मान्य नाही केलं.. परंतु आता काही वर्षांनी हे प्रकरण उघडकीस येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला 90 च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने नुकताच एक असा किस्सा सांगितलं आहे ज्यातून तिच्या तेव्हा सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आणि ज्या व्यक्तीवर त्या अभिनेत्रीचे प्रेम जडले होते, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आहे आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असे. मग ते वैयक्तीक जीवनामुळे असो वा प्रोफेशनल आयुष्यात. अक्षय कुमार जसजसा सुपरस्टार होत गेला त्यासोबतच त्याचे नाव अनेक अभिनेत्र्यां सोबत जोडले जाऊ लागले होते. रविना टंडन, रेखा, ट्विंकल खन्ना अशा अनेक अभिनेत्र्यां सोबत अक्षयचे नाव जोडले जाऊ लागले.

त्या यादीतील आणखी एक नाव म्हणजे शिल्पा शेट्टी. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी, ज्यांना 90 च्या दशकाचे सुपर हिट कपल म्हटले जाते ते एकमेकांच्या अगदी जवळचे होते. दरम्यान, त्यांच्या प्रेमाची चर्चा बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये झपाट्याने पसरली. दिवसेंदिवस दोघे कायम एकत्र दिसल्याने दोघांबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या.

असा अंदाज वर्तविला जात होता की लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत. पण त्यांच्या नात्याला ग्रहण लागले आणि अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न करून सर्वांना चकित केले. पण शिल्पा मात्र हा धक्का सहन करू शकली नाही. अक्षयला विसरण्यास ती तयार नव्हती.

मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीदरम्यान शिल्पाने अक्षयवर गंभीर आरोप केले होते. अक्षयवरह असे आरोप लावले गेले होते, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. मुलाखतीदरम्यान शिल्पाने तिचे आणि अक्षयच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि सांगितले की अक्षय आमच्या नात्याबद्दल गंभीर आहे असं वचन त्याने मला दिले होते आणि मला वाटले की लवकरच लग्न करू.

शिल्पाने सांगितले की अक्षयने तिला ट्विंकलसाठी फसवले होते. त्याने मला अनेक वेळा वापरले. शिल्पा म्हणाली की मी साधारण 22 वर्षांचा होते. मला याची जाणीव नव्हती, मी त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत असे. शिल्पा म्हणाली की अक्षयने फक्त तिचाच नव्हे तर बर्‍याच मुलींचा विश्वासघात केला.

जर एखाद्या मुलीला त्याच्या बद्दल शंका आली तर तो तिच्यासोबत साखरपुडा करून घ्यायचा आणि तिचा विश्वास जिंकायचाशिल्पाने तिच्यावर पुढे आरोप केला की, प्रेमाची शपथ घेणे त्याच्यासाठी खुप सामान्य गोष्ट होती. पण तेच आयुष्यात नवीन मुलगी आल्यानंतर केलेले आश्वासन तो विसरायचा आणि लग्नाला नकार द्यायचा.

शिल्पाने अक्षयचे दिलफेंक आशिक असे वर्णन केले आणि सांगितले की त्याने माझे आयुष्य नरक केले. तो क्षण मी कधीही विसरणार नाही.