‘या’ अभिनेत्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली होती श्रुती हासन ! सेटवरून लीक झाले होते ‘तसले’ फोटो

अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) हिनं अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. सध्या ती साऊथच्या इंडस्ट्रीत जास्त सक्रिय असल्याचं दिसत आहे. श्रुती सोशल मीडियावर सुपरअॅक्टीव असते. श्रुतीनं अनेकदा आपल्या हॉट अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यामुळे ती अनेकदा सोशलवर चर्चेचा हिस्सा बनताना दिसली आहे.

श्रुतीनं बिकिनीतील फोटोही शेअर केले आहेत. श्रुती अनेकदा वादातही राहिली आहे. श्रुती कधी आपल्या सर्जरीमुळं चर्चेत राहिली आहे तर कधी आपल्या बोल्ड सीन्समुळं. तिचे काही बोल्ड फोटो एकदा लीकही झाले होते ज्यामुळं ती रातोरात चर्चेत आली होती.

2014 साली जेव्हा श्रुती तिचा तमिळ सिनेमा येवडु ची शुटींग करत होती तेव्हा तिचे काही फोटो लीक झाले हते. त्यामुळं ती खास चर्चेत आली होती. श्रुती या सिनेमासाठी डिंपल पिंपल नावाचं एक गाणं करत होती. यावेळी तिचे काही बोल्ड फोटो लीक झाले होते. हे फोटो एवढे व्हायरल झाले होते की, गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेले फोटो ठरले होते.

याशिवाय श्रुतीनं डी डे या बॉलिवूड सिनेमामुळंही चर्चेत राहिली आहे. या सिनेमात श्रुतीनं एका वेश्येची भूमिका साकारली होती. या सिनेमाचं एक पोस्टर खूप वादात होतं. या पोस्टरमध्ये श्रुती अर्जुन रामपाल सोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली होती. यामुळंही खूप वाद झाला होता. सिनेमात श्रुतीनं खूप बोल्ड सीन दिले होते.

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती साऊथ सुपरस्टार धनुष सोबत थ्री या सिनेमात झळकली होती. श्रुती बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही सक्रिय आहे. तिनं अनेक फेमस साऊथ इंडियन सिनेमात काम केलं आहे. वानरम आयिरम, पृथ्वी, येननामो येधो असे अनेक सिनेमे केले आहेत.

लक सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. परंतु हा सिनेमा खास काही चालला नाही. दिल तो बच्चा है जी, रमैया वस्तावैया, वेलकम बॅक, गब्बर अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे.