शाहरुखची ही अभिनेत्री झाली होती चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान प्रेग्नन्ट.. मग घडले असे काही तुमचा विश्वास नाही बसणार..

असे म्हटले जाते की महिला त्यांच्या गरोदरपणात काम करू शकत नाहीत. परंतु बॉलिवूडमध्ये अश्या बर्याच अभिनेत्र्याआहेत ज्या शूटिंगच्या काळात गर्भवती झाल्या. परंतु तरीही, त्यांनी त्यांच्या कामात खंड पडू दिला नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रेग्नन्ट झाली परंतु तरीही तिने पुढे काम सुरू ठेवले.

प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला आपल्या सर्वानाच परिचित आहे. जूहीने आपले सौन्दर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिच्या फिल्मी करिअरमध्ये बरेच नाव कमावले आहे. जुहीने चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पात्रे साकारली आहेत. जेव्हा जेव्हा ती पडद्यासमोर येते तेव्हा तिच्यापासून नजर हटवणे कठीणच असते.

चित्रपटा सोबतच जुही चावला एक व्यावसायिक देखील आहे. शाहरुख सोबत तिने आयपीएल मधीक परिचित संघ कोलकाता नाईट रायडर्स विकत घेतला होता. यासोबत तिचे अनेक व्यवसाय आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला एक जुही बद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी खूप कमी लोकांना माहीत आहे

फार कमी लोकांना माहित आहे की जुहीच्या चित्रपट कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा ती चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ग र्भ वती झाली होती. सहसा महिला गर्भवती झाल्यानंतर कोणताही कठोर परिश्रम करणे टाळतात. पण जूहीने घरी बसण्याऐवजी ग र्भ वती अवस्थेत काम करण्याचे ठरवले.

सुजॉय घोष यांच्या ‘झंकार बीट्स’ चित्रपटाच्या वेळी जूही चावला तिच्या दुसर्‍या मुलासह गरो दर होती. हा चित्रपट जून 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि 21 जुलै 2003 रोजी जूहीने तिच्या मुलाला जन्म दिला. अर्जुन मेहता हे जुहीचे दुसरे मूल होते. चला आता आम्ही तुम्हाला आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो.

खरंतर जुहीने गरोदरपणात काम करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही अमेरिकेतील स्टेज शोमध्ये काम करण्याची ऑफर जुहीला मिळाली होती. त्यावेळेला जुही तिच्या पहिल्या मुलासह गरो दर होती. अशा परिस्थितीत जुहीने गरो दर असताना ही नृत्य सादर केले आणि नंतर फेब्रुवारी 2001 मध्ये पहिली मुलगी जाह्नवीला जन्म दिला.

१९९५ साली जुहीने एका मोठ्या उद्योगपती जय मेहताशी लग्न केले होते. या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत ज्यात मोठी मुलगी जाह्नवी आणि धाकटा मुलगा अर्जुन यांचा समावेश आहे. जुही एकदा म्हणाली होती की तिची मुलगी जाह्नवीला मोठं होऊन अभिनेत्री नव्हे तर लेखक व्हायचं आहे.

चित्रपटांबद्दल बोलताना, जूहीने 1986 मध्ये ‘सल्तनत’ चित्रपटापासून करिअरची सुरूवात केली होती. हा चित्रपट एवढा चालला नाही पण त्यानंतर जुहीने कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण तिथे सुद्धा तिला यश मिळाले नाही म्हणून त्यानंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये परतली.

येथे ‘कायमत से कयामत’ या चित्रपटाद्वारे तिचे नशीब रातोरात पालटले. या चित्रपटाने तिला एका रात्रीच स्टार बनविले. चित्रपटातील जुहीचे काम प्रेक्षकांना आवडले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सध्या ती चित्रपटात काम करत नसली तरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.