आई होताच सोनम कपूर ला वाटू लागली त्याची भीती, सोडणार देश ??

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नुकतीच आई झाली आहे. आपण आई झाल्याची गोड बातमी तिने समाजमाध्यमांवरून दिली. सध्या तिच्या या गुड न्यूजमुळे तिच्या घरी तसेच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोनमच्या मुलाचे फोटो तिची बहीण रिया कपूर हिने समाजमाध्यांवरून शेअर केले होते ज्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

आपल्या या गुड न्यूजनंतर सोनमचा एक इंटरव्ह्यू सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे तिनं दिलेला व्होज मॅगझीनसाठी इंटरव्ह्यू. हा इंटरव्ह्यू तिनं तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे. ज्यात तिला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना तिनं आपल्या मनातील भिती व्यक्त केली आहे. 

तिला विचारण्यात आले की तु आपल्या मुलाचे संगोपन लंडनमध्ये करणार की भारतामध्ये? या प्रश्नाचे उत्तर देताना सोनम म्हणाली, “खंर सांगायचे तर, मी माझ्या मुलाला इथे शाळेत घालणार की लंडनमध्ये हे ठरवले नाही, पण मला माहित आहे की मला भारतात घरी असल्यासारखं वाटतं. मीही मुंबईची मुलगी आहे. 

जर मी माझ्या मुलाला इथे मी वाढवले तर प्रायव्हसीचा प्रश्न नक्कीच उद्भवेल… मी अनेक स्टार कीड्सना सर्वसामान्य आयुष्य जगताना पाहिले आहे. मी सध्या तरी काही ठरवले नसले तरी मी लवकरच हा निर्णय घेईन”, असा इशारा सोनमनं बोलता बोलता दिला असला तरी तिने सध्या कसलाच निर्णय घेतलेला नाहीये.  

मुल होण्याबाबत सोनमनं केला हा मोठा खुलासा


व्होग इंडियाशी बोलताना सोनम कपूर म्हणाली, ”लग्नाच्या दोन वर्षांनीच आम्ही मुलाचा घेणार होतो. परंतु तेव्हा कोविड आला होता. तेव्हा मी आनंदकडे त्याच्या आई-वडिलांच्या घरी दिल्लीला राहत होते. तेव्हा आम्हाला वाटले की आता वेळ दवडून काही उपयोग नाही आताच योग्य वेळ आहे. तेव्हा आम्ही दोघांनाही मुलासाठी निर्णय घेतला. गेल्या वर्षीच्या जूनमध्येच मी माझ्या मनातील ही गोष्ट आनंदकडे मांडली होती.”