बेबी डॉल सनी लिऑनीला ड्रेसची चैन लावायला घ्यावी लागतेय तीन लोकांची मदत.. लॉकडाऊन मध्ये वाढले-

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone ) तिच्या फिगर आणि फिटनेसबद्दल किती सतर्क आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. पण हे काय? लॉकडाऊनच्या काळात जरा काय दुर्लक्ष झाले आणि सनी लिओनीचे वजन काही किलोंनी वाढले.

मग काय? सनीला कपडेही फिट येईना झालेत. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. या व्हिडीओत सनीच्या ड्रेसची जिप लावण्यासाठी एक-दोन नाही तर तीन तीन लोक प्रयत्न करताना दिसताहेत.

सनीने खुद्द हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. यात तिने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. गाऊन अंगावर चढवला. पण त्याची जिप काही केल्या लागेना. अख्ख्या टीमने प्रयत्न केला, पण तरीही ही जिप लागली नाही.

सनीचा हा व्हिडीओ ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’च्या (MTV Splitsvilla) मेकअप रूममधला आहे. एका ड्रेसने तिची कशी फजिती केली, ते या व्हिडीओत पाहायला मिळतेय. ‘गाऊन परफेक्ट दिसण्यासाठी आर्मीची गरज असते,’ असे कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.

सनी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या बोल्ड फोटोंची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. इन्स्टाग्रावर तिचे अनेक हॉट फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद देखील मिळतो. 

खरे तर सनी लिओनीच्या कामाबद्दल सगळेच जाणतात. पण तिच्या स्ट्रगलबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या स्ट्रगलिंग काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले होते. या बेकरीत तिला प्रचंड मेहनत करावी लागत असे. याशिवाय तिने एका टॅक्स फर्ममध्येही पार्टटाईम जॉब केला होता.

सध्या सनी केरळमध्ये असून तिथे तिनं फोटोशुट केलं आहे. तिची वेशभुषा पाहिल्यास ती पूर्णपणे केरळच्या कल्चरमध्ये सामावल्याचे दिसत आहे. तिचा तो लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

सनीचा साऊथ इंडिय़न लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीचा आहे. त्यातील एका फोटोमध्ये सनी होडीमध्ये बसली आहे. तिनं पिंक कलरचा ब्लाऊज परिधान केला आहे. पिंक कलरची बिंदी, त्याच रंगाच्या बांगड्याही लक्ष वेधून घेत आहे.

सनीचा हा लूक एकदम सॉलिड आहे. तो चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या फोटोंना कॅप्शन देताना तिनं लिहिले आहे की. केरळ मला प्रचंड आवडले आहे. त्याच्या प्रेमातच मी पडले आहे. येथील निसर्ग खूपच छान असल्याचे तिनं सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वी सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तिनं हाय हिल्स घातले होते. आणि ती फोटोशुट करत होती. अशावेळी तिचा तोल गेल्यानं ती स्विमिंग पूलमध्ये पडली. त्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.