ब्रेकअपनंतर आता 17 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत रात्री हॉटेलमध्ये सापडली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री सुष्मिता सेन अनेकदा तिच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. बऱ्याच दिवसांपासून ती रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. त्यात अलीकडेच तिने उघड केले की तिचा ब्रेकअप झाला आहे.

ही बातमी समोर येताच अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता सुष्मिताचा हॉटेलमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ब्रेकअपनंतरही ही अभिनेत्री आपल्या एक्स बॉयफ्रेंडला भेटते. आणि ती त्याच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

पुन्हा एकदा रोहमन आणि सुष्मिता एकत्र दिसल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. सुष्मिताने जेव्हा रोहमनसोबत नातं संपवल्याचं जाहीर केलं, त्यानंतर ते कधीच एकत्र दिसले नाही. पण आता पुन्हा ते डिनर डेटला गेल्याचं दिसून आलं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रोहमन सुष्मिताला गर्दीतून वाचवताना दिसत आहे.

याआधी अनेक सेलिब्रिटींसोबत सुष्मिताचे नाव जोडले गेले आहे. पण रोहमनसोबत तिचे खास बॉण्ड होते.ती सोशल मीडियावर देखील रोहमनसोबतचे रोमॅन्टिक व्हिडिओ शेअर करत होती. पण अखेर या नात्यातही तिला अपयशच आले. आता सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसत आहे. आता चाहत्यांच्या मनातही या दोघांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.