वयाच्या 33 वर्षी लग्न न करता ही अभिनेत्री होणार ‘आई’, लोक म्हणायला लागले कुठं तोंड काळ…

स्वरा भास्कर या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्रीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. स्वरा भास्कर ही खूप चांगली अभिनेत्री आहे आणि तिने आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. पण स्वरा भास्कर नेहमीच तिच्या बिनधास्त बोलण्यामुळे चर्चेत असते.

स्वरा भास्कर सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून कोणत्या ना कोणत्या सामाजिक किंवा राजकीय विषयावर बोलते आणि चर्चेत येते. यावेळीही स्वरा भास्कर चर्चेत आलीय पण तिच्या चर्चेत येण्याचा विषय यावेळी काही औरच आहे.

झी न्यूजच्या बातमीनुसार, स्वरा भास्करचे अजून लग्न झालेले नाही पण स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. होय मित्रांनो, खरं तर स्वरा भास्कर एक मूल दत्तक घेणार आहे. त्यांनी मुले दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडे नोंदणी देखील केली आहे आणि लवकरच ते संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतील.

स्वरा भास्करच्या या बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयामुळे , तिचे लग्न कधी होणार आणि लग्नाशिवाय ती मूल का वाढवत आहे, असे वेगवेगळे प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत. झी न्यूजच्या बातमीनुसार, स्वरा भास्करने सांगितले की, ती खूप पूर्वीपासून मुलाला दत्तक घेण्याचा विचार करत होती.

तिने सांगितले की मी अशा अनेक पालकांना भेटले आहे ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत आणि ती त्या मुलांना देखील भेटली जी आता खूप मोठी झाली आहेत. स्वरा भास्करच्या या निर्णयाला तिच्या पालकांनीही पाठिंबा दिला आहे. स्वरा भास्करच्या आईने सांगितले की, स्वराने लवकरच आई व्हावे अशी तिची इच्छा होती. स्वरा भास्करही स्वतःच्या या निर्णयावर खूप खूश आहे.

अनेकांच्या उंचावल्या भुवया

स्वरा भास्करने सांगितले की, तिला नेहमीच एक आनंदी कुटुंब हवे होते. त्यासाठी त्यांनी आता मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वरा भास्करच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या व लोक तिला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत, काही लोक स्वरा भास्करच्या या निर्णयाचा निषेध करत आहेत तर काही लोक स्वरा भास्करच्या या निर्णयाचे समर्थन करत आहेत.