या अभिनेत्यांसोबत सं-बं-ध ठेवून मग अंबानीच्या घरची सून झाली होती टीना.. संजय दत्तने अनेकदा घेतलं होतं..

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात पाऊल ठेवल्यानंतर कलाकार एकतर सातव्या आस्मानात असतो.. किंवा मग थेट जमिनीवर आदळतो. परंतु एक गोष्ट नक्की की जमिनीवर आदळला तरी लोकांच्या नजरेत मात्र तो कलाकार कायम राहत असतो. आपले नशीब चमकावे या आशेने प्रत्येक कलाकार आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक असतो.. परंतु प्रत्येकाचं नशिब चमकतेच असे नाही. अनेकांच्या पदरात निराशा देखील पडते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या बॉलिवूड करिअर ची सुरुवात खूप चांगली झाली, परंतु नंतर ती आपली लोकप्रियता टिकवू नाही शकली. त्यामुळे त्यांना इंडस्ट्री तर सोडावी लागली पण त्या आधी त्यांनी शक्कल लढवून अब्जाधीशासोबत लग्न केलं.. आणि आता करोडोंच्या मालकीण आहेत. तर चला जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री..

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री टीना मुनीम बद्दल. टीनाने बिझनेसमन अनिल अंबानीशी लग्न केले आणि आपल्या कारकीर्दीला निरोप दिला. एक काळ असा होता की टीना आपल्या अभिनयाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करायची. इतकेच नव्हे तर १९७५ साली तिने ‘फेमिना टीन प्रिन्सेस’ हा मुकुट जिंकला होता.

टीना अंबानी यांची चित्रपट कारकीर्द तर कायम चर्चेत राहिलीच. पण त्यासोबत त्यांचे खाजगी आयुष्य देखील नजरेत असायचे. अनेक कलाकारांसोबत असलेल्या त्यांच्या नात्यावरही बरीच चर्चा झाली आहे. त्यातल्या त्यात टीनाचे नाव एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याशी संबंधित बराच काळ चर्चेत राहिले आहे.

तुम्हाला ऐकून धक्का बसेल , संजय दत्त आणि टीनाचे नाव त्याकाळी अनेकदा चर्चेत राहीले होते. संजय आणि टीना यांनी रॉकी चित्रपटात एकत्र काम केले होते आणि या दोघांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. या चित्रपटामध्ये काम करत असतानाच दोघे चांगले मित्र झाले झाले आणि नंतर या मैत्री चं रूपांतर प्रेमात झालं. पण हे सं बंध फार काळ टिकू शकले नाहीत

‘रॉकी’ चित्रपटामुळे मिळालेल्या यशामुळे संजय दत्त हवेत होता. त्याने अनेक प्रकारची व्यसनं करायला सुरुवात केली आणि अशा परिस्थितीत तो आपल्या करिअर आणि नात्याकडे दुर्लक्ष करू लागला. टीना ला मात्र हे सगळं सहन होत नव्हतं. त्यांच्या नात्याची चर्चा तेव्हा होऊ लागली जेव्हा संजय ला मुलाखतींमध्ये त्याची क्रश कोण आहे विचारलं असता त्याने अनेकदा टीनाचं नाव घेतलं होतं.

नंतर मात्र संजय आणि टीना यांच्यातील दुरावा वाढत गेला. टीना आणि अनिल अंबानी यांची प्रेमकथादेखील खूप रंजक होती . अनिल अंबानी यांनी टिनाला एका लग्नात पहिल्यांदा पाहिले होते. टिनाने या लग्नात काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या कार्यक्रमामध्ये टीनाला बघताच अनिल अंबानी तिच्यावर फिदा झाले होते आणि जवळच्या मित्राला त्यांनी तसं बोलून ही दाखवलं.

त्यानंतर दोघे विदेशात एका कार्यक्रमात भेटले. त्या काळात या दोघांशी पुन्हा ओळख झाली. दोघांमधील मैत्री वाढली. त्यानंतर अनिलने टिनाला डे ट वरती येण्यास सांगितले पण टीनाने नकार दिला. टिनाला त्यावेळी रिलायन्स आणि अनिल च्या कुटुंबाविषयी काहीच माहिती नव्हती.

परंतु अखेर अनिल यांच्या साधेपणा वर टीना भाळली. इतक्या मोठ्या कुटुंबातून असून देखील अनिल अगदी साधे राहायचे. दोघे प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे अजूनही सुखी वैवाहिक आयुष्य जगतायत. आणि लग्नानंतर टीनाने देखील बॉलिवूड ला राम राम केलं.