घाणेरड्या चित्रपटांचे शूटिंग करत असतांना उर्फी जावेद ला अटक ?, पोलिसांनी केलं सगळंच रेकॉर्ड

अभिनेत्री, डान्सर, मॉडेल उर्फी जावेदविषयी काय आणि किती बोलायचं याला काही अंतच नाही. दर दिवसाआड तिच्या इन्स्टापेजवर भन्नाट ड्रेसमधले फोटो शेअर करून ती चर्चा घडवत असतेच. तिला जे मनाला पटेल ते ती बिनधास्त करत असते. पण तिचं हे बिनधास्तपणे काहीही करणं तिच्या अंगलट येऊ शकतं हे दाखवणारी एक घटना उर्फीच्या आयुष्यात नुकतीच घडली.

शूटिंग करत असताना अचानक तिथे पोलिस आले. उर्फीला ताब्यात घेऊन मा’ र’ हा’ ण करायला सुरुवात केली. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे उर्फी जावेद चर्चेत आली आहे. पोलिसांनी तिला का पकडलं याचं सत्य समोर आल्यानंतर तिची सुटका झाली. बॉलिवूडमधील कंटेंट क्रिएटर रोहित गुप्ताच्या इन्स्टापेजमुळे ही घटना वाऱ्यासारखी पसरली. एकतर उर्फीची बातमी म्हणजे काहीतरी खळबळजनक असणार हे नेटकऱ्यांना कळून चुकलंय.

त्यामुळेच या व्हिडिओवर नेटकरी आणि उर्फीचे चाहते यांच्या उड्या पडल्या. उर्फी एका पॉ’ र्न फिल्मचं शूट करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तडक ते ठिकाण गाठत उर्फीला पडकलं. तिला पोलिसी खाक्याही दाखवला. असा व्हिडिओ पाहताच खरं तर उर्फीच्या चाहत्यांना वाईट वाटलं. पण समोर जे काही दिसत होतं त्याचा शेवट पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, उर्फी एका ऑफिसमध्ये बसली आहे. तिथे दिग्दर्शकाशी सिनेमाविषयी बोलणं सुरू आहे. दिग्दर्शक तिला सांगतोय, की या सिनेमातील हिरो थेट परदेशातील आहे. तर या सिनेमात खलनायक साकारण्यासाठी रणबीर कपूरने होकार दिलाय. हे ऐकून उर्फी फक्त आनंदाचे नाचायचीच बाकी राहते. तितक्यात परदेशी हिरो म्हणून युगांडाचा अभिनेता उर्फीच्या समोर येताच तिच्या चेहऱ्यावर बारा वाजतात.

हा सगळा सावळा गोंधळ सुरू असतानाच तिथे पोलीस आल्याचे पाहताच उर्फी अजूनच चिडते. तीन पुरूषांसोबत उर्फी तिथे काय करत होती. जे सुरू आहे ते पॉ’ र्न फिल्मचं शूटिंग तर नाही ना? या पोलिसांच्या प्रश्नावर उर्फीलाही घाम फुटतो. तर इतर तिघेजण उर्फीकडे बोट दाखवतात. मग मात्र उर्फीचा पारा अधिकच चढतो. मॅनेजरला फोन लावून या फालतू ऑडिशनला पाठवल्याबददल ती जाळ काढते.

पण तिचा मॅनेजर जे काही सांगतो तेव्हा त्या सगळ्या घटनांचा फुगा फुटतो आणि हशा पिकतो.खरं तर उर्फीची गंमत करण्यासाठी तो सगळा प्लॅन केल्याचं तिला सगळे सांगतात. तो सिनेमाही खोटा असतो, कलाकारही खोटे असतात आणि पोलीसही खोटे असतात. ना तिथे पॉर्न फिल्मचं शूटिंग सुरू असतं आणि ना पोलिसांचा आरोप खरा असतो. पण आपल्या अदांनी, हटके फोटोंनी नेटकऱ्यांना घायाळ करणाऱ्या उर्फीला पोलिसांचा तो खाक्या काही वेळ का असेल घाम फोडतो.

पण तिने स्वत:ला सावरलं. मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेऊन तिला मीडियात काम करायचं होतं. पण आयुष्याला कलाटणी मिळाली आणि उर्फी मॉडेलिंगमध्ये आली. आता कॅमेऱ्यामागे नव्हे तर ती कॅमेऱ्यासमोर येत प्रसिध्द झाली आहे.

उर्फी आणि पॉ’ र्न फिल्म यांचं एक दुर्दैवी कनेक्शन आहे. ती १५ वर्षाची असताना तिच्या काही मित्रांनी फेसबुकवरून तिचा फोटो कॉपी करून पॉ’ र्न साइट वर अपलोड केला होता. यावरून तिच्या घरात खूप गोंधळ झाला. तिला आणि तिच्या कुटुंबाला नातेवाईकांचा त्रास झाला. उर्फीची पॉ’ र्न स्टा’ र म्हणून बदनामी झाली. या सगळ्याच्या त्रासाने उर्फी आ’ त्म’ ह’ त्या ही करणार होती.