ज्या डायरेक्टर सोबत संबंध ठेवून झाली सुपरस्टार.. नंतर त्याला नादाला लावून अभिनेत्रीने दुसऱ्या सोबत थाटला संसार..

अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत बालकलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.

पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. पण काही कलाकार असे होते ज्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटातून बाल कलाकार म्हणून केली.

परंतु नंतरही आपल्या अदाकारीच्या जोरावर ती चित्रपटां मध्ये ही झळकली. आणि नंतर मोठी झाल्यावरही आपला जलवा कायम ठेवला. आम्ही बोलत आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बद्दल जिने आपल्या सौन्दर्यांच्या जोरावर एकेकाळी लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले.

बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. बॉलिवूड कारर्किदीबरोबरच तिने राजकारणाची इनिंग देखील सुरू कली आहे. उर्मिला मातोंडकरने नुकताच आपला 47 वा वाढदिवस साजरा केला आहे. उर्मिलाचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबई येथे झाला होता

उर्मिलाने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली. तिने प्रथम ‘मासूम’ चित्रपटात काम केले. त्या चित्रपटातील अभिनयानुळे उर्मिला स्टार झाली होती. रामगोपाल वर्माच्या रंगीला चित्रपटात ती दिसली होती आणि तेव्हापासून बॉलिवूडमध्ये उर्मिलाची एक वेगळी ओळख निर्माण झाली.

मात्र, याचदरम्यान उर्मिला राम गोपाल वर्माच्या प्रेमात पडली होती. रंगीलानंतर उर्मिला राम गोपाल वर्माच्या सत्या, भूत आणि कौनसारख्या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटांच्या दरम्यान उर्मिला आणि राम गोपाल वर्मा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कालांतराने दोघांचेही प्रेम टिकू शकले नाही. पण त्यांच्या या नात्याबद्दल सर्वत्र बातम्या आल्या.

राम गोपाल वर्माशी असलेल्या नात्याचा परिणाम उर्मिलाच्या कारकिर्दीवर झाला. राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर या दोघांनीही कधीच त्यांचा संबंध स्वीकारले नाही. जेव्हा दोघे वेगळे झाले तेव्हा उर्मिलाला चित्रपट मिळत मिळाले नाही. तिला चित्रपटांच्या आॅफर देखील येणे बंद झाले.

उर्मिलाने हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

फिल्मी जगापासून थोड दूर गेल्यानंतर उर्मिला मातोंडकरने 2016 मध्ये काश्मिरी मॉडेल आणि उद्योगपती मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसीन उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे.