फिल्मी करिअर फ्लॉप तरीही ‘ह्या’ धंद्यातून पैसा कमावते उर्वशी रौटेला पैसे, एका रात्रीचे…

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्वशी नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असते आणि ती प्रत्येक वेळी तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजपर्यंत लाखो हृदयांत ती असली तरी ती एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही. पण असे असूनही ती आलिशान जीवन जगते. तुम्ही कधी विचार केला आहे की असे कसे शक्य आहे?

उर्वशी रौटेलाची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही खूप आहे. ती जगभर फिरून आपल्या सौंदर्याची जादू पसरवताना दिसत असते. एवढेच नाही तर तिला “इंडियाज प्राईड अँड मोस्ट पॉवरफुल वुमन 2022” हा अवॉर्डही मिळाला आहे. हा पुरस्कार जिंकणारी उर्वशी पहिली भारतीय ठरली आहे.

हा पुरस्कार दुबईत देण्यात आला. उर्वशी बॉलिवूडमध्ये फारसे नाव कमवू शकली नसली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप श्रीमंत होत आहे आणि परदेशात तिची ओळख अधिक घट्ट होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्वशी रौतेलाची एकूण संपत्ती 36 कोटी रुपये आहे. उर्वशी रौटेला हिची गणना बॉलीवूडमधील अशा टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते, ज्यांची मासिक कमाई 45 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री चित्रपट आणि गाण्यांमधून मोठी कमाई करते. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ती एका गाण्यासाठी 35 ते 40 लाख रुपये घेते. त्याचवेळी उर्वशी एका चित्रपटासाठी सुमारे 3 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय उर्वशीच्या कमाईचा अर्धा हिस्सा ब्रँड एंडोर्समेंट म्हणजेच जाहिराती व मॉडेलिंगमधूनही येते. तिला अनेक मोठ्या फॅशन डिझायनर्ससाठी शोस्टॉपर बनण्याचा फायदा झाला आहे.

उर्वशी रौटेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिचा ‘नॉट युअर बेबी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही काळापूर्वी तिने या चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यासह ती आता हॉलिवूडमध्येही पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. उर्वशी 365 डेज फेम अभिनेता मिशेल मॉरोनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती “इन्स्पेक्टर अविनाशमध्ये” रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ती साऊथच्या Thiruttu Payale 2 च्या हिंदी रिमेकमध्येही काम करणार आहे.