फिल्मी करियर पूर्णपणे फ्लॉप तरीही एवढे रॉयल जीवन कसे जगते उर्वशी रौटेला, ह्या धंदयातुन कमावते करोडो रुपये…

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतसोबतचा झालेला अपघात आणि तिने पोस्ट केलेल्या इन्स्टाग्रामवर च्या पोस्ट मुळे खूप चर्चेत आहे. उर्वशी रौतेलाचे सिनेमे फ्लॉप झाले असले तरी. पण ती अतिशय आलिशान जीवनशैली जगते. तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का उर्वशी रौतेलाचे करिअर फ्लॉप असूनही तिने एवढी कमाई कशी केली. चला जाणून घेऊया

उर्वशी रौतेलाचे चित्रपट लोकांना आवडत नसतील, पण तिची गाणी लोकांची मने जिंकतात. यामुळेच अनेक बड्या म्युझिक कंपन्या आयटम साँगमध्ये उर्वशी रौतेलाला अप्रोच करतात, त्या बदल्यात तिला करोडो रुपये मिळतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी रौतेला एका आयटम साँगमध्ये काम करण्यासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते.

प्रत्येक कार्यक्रमात उर्वशी उपस्थित असते आणि ती प्रत्येक वेळी तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लाखो हृदयांची राणी आजपर्यंत एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही. पण असे असूनही ती आलिशान जीवन जगते. आपण बऱ्याचदा याबाबत विचारही केला असेलच. उर्वशी रौतेलाची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर परदेशातही खूप आहे. जगभर फिरून ती आपल्या सौंदर्याची जादू पसरवताना दिसत आहे.

इतकंच नाही तर तिला प्राइड ऑफ इंडिया आणि मोस्ट पॉवरफुल वुमन 2022 चा पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार जिंकणारी उर्वशी पहिली भारतीय ठरली. तिला हा पुरस्कार दुबईत देण्यात आला. उर्वशी बॉलीवूडमध्ये फारसे नाव कमवू शकली नसली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप श्रीमंत आहे आणि परदेशात तिची ओळख अधिक घट्ट होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्वशी रौतेलाची एकूण संपत्ती 36 कोटी रुपये आहे.

उर्वशी रौतेला हिची गणना बॉलीवूडमधील टॉप कलाकारांमध्ये केली जाते, जिची मासिक कमाई 45 लाखांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री चित्रपट आणि गाण्यांमधून खूप कमाई करते. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ती एका गाण्यासाठी चिक्कार फी घेते. त्याचबरोबर उर्वशी एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये घेते. याशिवाय उर्वशीची अर्धी कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधूनही येते. अनेक मोठमोठ्या फॅशन डिझायनर्सची शोस्टॉपर असण्याचाही फायदा तिला मिळाला आहे.