लग्नानंतर विकी मोठ्या संकटात, कतरिनापासून दूर जाण्याची येणार वेळ ?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकी कौशलने स्कुटी चोरल्या आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विकी कौशलवर पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आलाय.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला

एनआयए या वृत्तसंस्थेनुसार, तक्रारदार जयसिंग यादव यांनी सांगितले की, चित्रपटाच्या एका दृश्यात वापरलेली स्कुटी माझी आहे. कारण माझ्या वाहनाचा  क्रमांक तोच आहे.  चित्रपट युनिटला याची माहिती आहे की नाही, हे मला माहीत नाही, पण हे बेकायदेशीर आहे.

माझ्या परवानगीशिवाय ते बाइकचा नंबर वापरू शकत नाहीत. मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कारवाई करावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे. त्यामुळे आता नुकतंच लग्न झालेला अभिनेता विकी कौशलच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

इंदूरच्या बाणगंगा परिसरात उपनिरीक्षक राजेंद्र सोनी यांनी याबाबत सांगितले की, आम्हाला तक्रार आली आहे. नंबर प्लेटचा वापर बेकायदेशीरपणे केला गेला आहे की नाही हे आम्ही तपासात पाहू. त्यानंतरच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.

विकी – साराचे फोटो व्हायरल

हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि सारा अली खानचे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दोन्ही स्टार्स बाईकवर इंदूरच्या रस्त्यावर फिरताना दिसले होते. वास्तविक, हे दोन्ही स्टार्स सध्या इंदूरमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत, ज्याचे नाव आहे ‘लुका छुपी 2’. यादरम्यान साराच्या मागणीतील सिंदूराचे फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले होते.