‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री कायम होत राहिली या गोष्टी मुळे ट्रोल.. पण नंतर त्यामुळेच रातोरात झाली स्टार..

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण, आज जागतिक महिला दिनानिमित्त तिच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे, जी खुद्द विद्याने सांगितली आहे. विद्या बालनला तिच्या वजनामुळे खूप टीकेचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत विद्याने तिचे हे दु:ख शेअर केले.

विद्या म्हणाली, ‘मी जे काही केले त्या परिस्थितीमधून जाणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते त्यावेळी ती टीका खूप सार्वजनिक आणि अपमानास्पद होती. मी चित्रपटांची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आले आहे. या क्षेत्रातला अंतिम टप्पा कोणता, हे सांगणारे माझे असे कोणी नव्हते. माझे वजन एक राष्ट्रीय समस्या बनली होती.’

एका प्रसिद्ध वेब साईटशी बोलताना विद्या म्हणाली, ‘मी नेहमीच एक वजनदार मुलगी होते. मी असे म्हणणार नाही की, माझे वजन कधीच कमी-जास्त झाले नाही. पण याबद्दल मी अजिबात चिंता केली नाही. परंतु, मी आता त्यापासून बरेच अंतर पुढे निघून आले आहे.

माझ्या आयुष्यात अनेक हार्मोनल समस्या आहेत. बराच काळ मी माझ्या शरीराचा द्वेष केला. मला वाटायचे की, त्यानेच माझा विश्वासघात केला आहे. ज्या दिवशी माझ्यावर माझे सर्वोत्तम दिसण्यासाठी दबाव यायचा, तेव्हा मला आणखी राग यायचा आणि मी निराश व्हायचे

जेव्हा विद्या बालन यांना बॉडी शेमिंग मुद्दय़ावर कसे डील करायचे असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘मी स्वतःवर प्रेम करण्यास सुरूवात केली. तेव्हा लोकांनी मला स्वीकारण्यास सुरूवात केली. त्यांनी माझ्यावर प्रेम आणि स्तुती करणे सुरू केले. कालांतराने, मी हे कबूल केले की माझे शरीरच मला जिवंत ठेवते

कारण, ज्या दिवशी शरीर काम करणे थांबवले, त्यादिवशी मी कुठेही जाऊ शकणार नाही. मी माझ्या शरीराची आभारी आहे. मी कोणत्या टप्प्यातून गेले, हे महत्त्वाचे नाही, परंतु मी आता सजीव आहे ते केवळ या शरीरामुळे!’

विद्या बालनचा हा प्रवास आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवतो. लठ्ठपणामुळे स्वत:ला कमजोर समजणारे लोक किंवा त्यांना वाटते की, लठ्ठपणामुळे लोक आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात, तर असे मुळीच नाही. तुम्हीही आपल्या शरीरावर, स्वतःवर प्रेम केले पाहिजे. त्याचबरोबर हे समजले पाहिजे की, हे शरीर आपल्यला देवानं दिलेलं आहे, ते पुन्हा मिळू शकत नाही.

होय, आपण निश्चितपणे आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. आपल्या शरीरासाठी नेहमीच सकारात्मक विचार करा. कारण नेहमी शेवटपर्यंत हे शरीरच आपल्याबरोबर असते. म्हणून, शक्य तेवढे स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.