अभिनेत्रीच्या प्रेमात पडून या दिग्दर्शकाने बरबाद करून घेतले स्वतःचे आयुष्य.. बायको आणि मुलाला सोडून आता जगतोय एकाकी आयुष्य..

प्रेम होणे हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक अगदी सुखद काळ असतो. पण प्रत्येक प्रेमकथा यशस्वी होतेच नाही, बर्‍याच प्रेमकथा अपूर्ण राहिल्या आहेत. आणि प्रेम कहाणी अधुरी राहिली तर दोघांनाही दु: खाचा सामना करावा लागतो. ही गोष्ट झाली सर्वसामान्य व्यक्तींची पण बॉलिवूड इंडस्ट्रीत वावरणारे आपले लाडके कलाकार यांच्या आयुष्यात देखील असे प्रसंग येत राहतात.

चित्रपट जगताविषयी बोलताना कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडणे सामान्य गोष्ट आहे. पण कधीकधी काही संबंधांमध्ये, लोकांना नंतर लक्षात येते की ते काहीतरी चुकीचे करीत आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या बाबतीतही अशीच घटना घडली जेव्हा त्यांनी एक अभिनेत्रीच्या प्रेमात पडून आपलं संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकलं.

बॉलिवूडमध्ये हॉरर आणि बोल्ड सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक विक्रम भट्ट सर्वपरिचित आहेत. 27 जानेवारी 1969 रोजी मुंबईत जन्मलेल्या विक्रम भट्ट यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच इंडस्ट्रीत काम करणे सुरु केले आणि पुढे ते इथेच रमला. त्यांचे वडील प्रवीण भट्ट बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर होते. विक्रम भट्ट व महेश भट्ट यांना लोक भाऊ आहेत, असे अनेकांना वाटते.

पण दोघांमध्ये कोणतेही रक्ताचे नाते नाही. विक्रम यांनी कॉलेज मैत्रीण अदितीसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे. मात्र याऊपर बॉलिवूडमध्ये विक्रम यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. एकदा तर विक्रम यांनी एका अभिनेत्रीसाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता

होय, एक काळ असा होता जेव्हा विक्रम भट्ट सुश्मिता सेनच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले होते. विवाहित असूनही विक्रम सुश्मितात गुंतले. इतके की तिच्यासाठी त्यांनी पत्नीला घटस्फोटही दिला. एका मुलाखतीदरम्यान विक्रम भट्ट यांनी याबद्दल खुलासा केला होता. ‘सुश्मितासोबतच्या अफेअरमुळे लहानपणीची मैत्रिण आणि पत्नी अदितीला घटस्फोट द्यावा लागला

वास्तविक मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हतो. परंतु परिस्थिती तशी उद्भवल्यामुळे मला हे कठोर पाऊल उचलावे लागले. पण पत्नी आयुष्यात गेली आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो. कारण मी माझे आयुष्य स्वत:च्या हातांनी उद्धवस्त केले होते.

मी माझ्या मुलीला वेड्यासारखे मिस करत होतो. माझी पत्नी मला सोडून निघून गेली तेव्हा मी घराच्या बाल्कनीमधून उडी घेऊन आ’त्मह-त्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते करण्यातही मी असमर्थ ठरलो. आता माझ्या आयुष्यात माझे स्वतःचे असे काही उरले नाही. पुढे मी पत्नीशी चांगले संबंध निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यात मी अपयशी ठरलो,’ असे त्यांनी सांगितले होते. सुश्मितासोबतचे अफेअर त्यांच्या आयुष्यातील सगळ्यांत मोठी चूक असल्याचेही त्यांनी मान्यही केले होते. त्या चुकीचा त्यांना आजही पश्चाताप होतो.

सुश्मिताच नाही तर अमिषा पटेल हिच्यासोबतही विक्रम यांचे अफेअर होते. ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या सिनेमाच्या सेटवर विक्रम व अमिषा एकमेकांत गुंतले होते. अमिषाही विक्रमसाठी वेडी होती. अगदी या नात्यासाठी ती आपल्या आईच्या विरोधात गेली होती. अमिषा व विक्रम यांचे नाते 5 वर्षे चालले. पण पुढे दोघांचे ब्रेकअप झाले.