शृंगार हा खरंतर जगातील सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. सुंदर दिसणे आणि मेक-अप करणे ही जवळजवळ सर्व महिलांची आवड आहे आणि ही अशी कला आहे जी जन्मजात सर्व स्त्रियांमध्ये असतेच आणि प्रत्यक्षात जेव्हा महिला मेकअप करून बाहेर पडतात तेव्हा त्या अर्थातच नेहमीपेक्षा सुंदर दिसतात.
बरं, ही बाब सर्वसाधारण महिलांची होती. पण जेव्हा बॉलिवूड जगताबद्दल किंवा टीव्ही सिरिअल्सबद्दल बोलायचं झालं तर या क्षेत्रात वावरणाऱ्या अभिनेत्र्याना मात्र मेकअप करणं अनिवार्य असतं. कारण त्यांना पाहणाऱ्यांची संख्या कोट्यावधीने असते. अशा परिस्थितीत, जर त्यांचा चेहरा चांगला दिसत नसेल प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होईल हे निश्चित.
खरंतर पडद्यावर अगदी अप्सरा दिसणारी आपली आवडती अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही इतकीच सुंदर असेल का? असा काहीसा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना नेहमीच पडत असेल. बऱ्याच अभिनेत्र्या अशा आहेत की ज्यांचं रूप फक्त मेक अप वरच उठून दिसतं आणि विना मेकअप मात्र त्या अगदीच सामान्य दिसतात.
आज आम्ही तुम्हाला तुमच्या काही आवडत्या अभिनेत्रींचा खरा चेहरा दाखवणार आहोत म्हणजेच त्यांचे काही असे फोटोज जे मेकअप शिवाय काढण्यात आले होते. हे फोटोज सोशल मीडियावर ही अनेक वेळा व्हायरल झालेले असून ह्या अभिनेत्र्या त्यांच्या चाहत्याकडून ट्रोल झाल्या आहेत.
माधुरी दिक्षीत – धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या अदाकारीचे तर सर्वच दिवाने आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का माधुरी दिवानी आहे मेक अप ची. तिचा आजचा मेकअप न घेतलेला फोटो पाहून तुम्हाला कळले की ती किती मेक अप करते.
सोनम कपुर – अभिनेत्री सोनम कपूर, जी सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे, ती बॉलिवूडमध्ये फॅशन क्वीन म्हणून ओळखले जाते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की सोनम चित्रपटांमध्ये खूपच सुंदर दिसते परंतु मेकअपशिवाय तिचा लूक खूपच वेगळा आहे.
मोनालीसा – भोजपुरी चित्रपट सृष्टीची शान मणि म्हणून ओळखल्या जाणार्या सुंदर आणि हॉट अभिनेत्री मोनालिसा तुम्ही पाहिलीच असेल. पण आज तुम्ही तिचा चेहरा मेकअपशिवाय पाहा, ती कशी दिसते. त्यावरून तुम्हाला कळेल की ती दिसण्यात अतिशय साधारण आहे.
आलिया भट्ट – बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्र्यांपैकी एक असलेली आलिया भट्ट, तिच्या सौंदर्य आणि निरागसतेमुळे आज मोठ्या संख्येने लोकांच्या मनावर राज्य करत आहे. सामान्य तरुणच नाही तर चक्क अभिनेता रणबीर कपूर ही आलीयाच्या प्रेमात पडलाय. पण मेकअपशिवाय आलियाचे हे रूप पाहून आपण देखील चकित होऊ शकता.
श्रीदेवी – बॉलिवूडची दिवंगत आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी जिने आपल्या अदाकारीने कोट्यवधी लोकांना वेड लावले. एका दु: खद घटनेमुळे ती आता आपल्या सर्वांमध्ये राहिलेली नाही, परंतु आजही ती लोकांच्या हृदयात आहे. ती देखील मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसत होती, जी आपण चित्रात स्पष्टपणे पाहू शकता.