विनोद मेहरा यांची दुसरी पत्नी आता आहे या प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी

सहजसुंदर अभिनय, बोलके डोळे आणि समोरच्याला क्षणात जिंकून घेईल अशा हास्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते म्हणजे विनोद मेहरा. बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत विनोद मेहरा यांनी सर्वांना वेड लावले होते.

त्या काळातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखले जाणारे विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत.पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये जन्मलेल्या विनोद मेहरा यांची अभिनयाची कारकीर्द आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही प्रचंड गाजले.

बिंदिया यांनी अभिनयक्षेत्र सोडले असले तरी त्यांनी जे.पी. दत्ता यांच्या काही चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले. रिफ्यूजी, एलओसी कारगिल, उमराव जान यांसारख्या चित्रपटातील कलाकारांचे कपडे त्यांनी डिझाइन केले आहे. जे. पी दत्ता आणि बिंदिया यांनी १९८५ मध्ये लग्न केले.

अभिनेत्री बिंदिया गोस्वामीने त्यांच्या काळात ‘ खट्टा-मीठा’ आणि ‘गोलमाल’ इत्यादी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिंदियाच्या मते, तिचा नवरा जे.पी. दत्ता यांना प्रवास करायला फार कमी आवडते, तर प्रवास करणे ही बिंदिया यांचा छंद आहे.

तसेच विनोद मेहरा यांनी तीन विवाह केले होते. विनोद मेहरा आणि रेखा यांच्या जवळीक आणि रोमान्सची चर्चा बरेच दिवस बॉलिवूडमध्ये चालू होती. असे म्हणतात की, त्यांनी लग्न देखील केले आहे. आता खरे काय आहे हे फक्त विनोद आणि रेखा यांनाच माहिती आहे.