वजनावर विनोद करणाऱ्या सुत्रसंचालकावर संतापली विशाख सुभेदार, म्हणाली.

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. मराठी मालिकांबरोबरच प्रेक्षक त्यांच्या कुटुंबासोबत हा कॉमेडी शो आवर्जून पाहतात. या शोमधील प्रेत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात अभिनेत्री विशाखा सुभेदारनं (Vishakha Subhedar) प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नुकतंच एका मुलाखतीत विशाखाने तिच्या वजनाबद्दल भाष्य केले आहे.

विशाखानं नुकतीच झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली. अभिनेता सुबोध भावे हा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे. प्रेक्षक महिला सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी एका महिला स्पर्धकानं प्रश्न विचारला की एखाद्या कार्यक्रमादरम्यान सहसा कॉमेडी कलाकारांना गांभीर्याने घेत नाही, असे कधी झालंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत विशाखा म्हणाली, ‘असं कधी होत नाही. पण एका कार्यक्रमादरम्यान माझ्या वजनावरुन खिल्ली उडवण्यात आली होती.’

कार्यक्रमातील तो किस्सा सांगत विशाखा म्हणाली, ‘मी एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी तिथे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी माझी ओळख करुन देताना आता आपल्यासमोर येत आहे वजनदार व्यक्तीमत्त्व विशाखा सुभेदार आणि त्यांचं वजन जितकं अभिनयात महत्त्वाचे आहे, तितकंच त्यांचं वजन… असे तो सतत वजन वजन बोलत होता. त्यानंतर मी जेव्हा बोलायला गेले तेव्हा एका वजनदार व्यक्तीमत्त्वाची एका किरकोळ माणसाने अत्यंत वजनदार पद्धतीनं ओळख करुन दिली आहे. तर या वजनदार माणसाकडून त्या किरकोळ आणि सामान्य माणसाला अतिशय मानाचा मुजरा. त्यावेळी त्याला अतिशय खजील झाल्यासारखं वाटलं.’