झरीन खानचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, ”वाईट परिस्थितही घेणार नाही सलमान खानची मदत कारण त्याच्या बदल्यात तो झ…”


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान ज्याने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये आणलं. ज्यामधले काही कलाकार खूप पुढे गेले. मात्र काही कलाकार मात्र मागेच राहिले. आणि कठिण प्रसंगातून जात आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री झरिन खान. वीर सिनेमातून पदार्पण करणारी झरीन खान आज कठिण प्रसंगातून जात आहे. सलमान खानसोबत तिने वीर सारख्या सिनेमात राजकुमारीचा रोल निभावला होता. मात्र हा सिनेमा काही खास करू शकला नाही पण लोकांना जरीन खान खूप आवडली.

जेव्हा जरीन खान आली तेव्हा बरेच लोक तिला कतरिना कैफची कार्बन कॉपी म्हणायचे. त्यामुळे झरीन खानला चित्रपटांमध्ये जास्त काम मिळू शकलं नाही. यानंतर अभिनेत्री हॉट चित्रपटांकडे वळली. झरीन खानने हाऊसफुल 2, हेट स्टोरी 3 सारख्या चित्रपटात काम केलं आहे. मात्र असं असतानाही अभिनेत्रीला निराशेचा सामना करावा लागला.

झरीन खानला जेव्हा कळलं की तिला आता हिंदी चित्रपट जगतात काम मिळत नाहीये, त्यानंतर तिने पंजाबी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. झरीन खानने सांगितले की, लोकांना इतर कोणावरही मोठे बॅनर किंवा मोठे चेहरे पाहायचे असतात. अभिनेत्री म्हणते की, तिला जे काही प्रोजेक्ट मिळेल त्यासाठी तिला हॉट फोटो दाखवायला सांगितले जात आहेत . या सगळ्याबद्दल बोलताना जरीन खान म्हणाली की, जोपर्यंत तिला तिच्या आवडीचा प्रोजेक्ट मिळत नाही तोपर्यंत ती पुन्हा अभिनयाकडे जाणार नाही.

झरीन खानने तिच्या मुलाखतीदरम्यान सांगितले होतं की, तिच्या घरात कमावणारी ती एकमेव व्यक्ती आहे, ज्यामुळे ती खूप नाराज होत आहे आणि जेव्हा झरीन खानला सलमान खानची मदत घेण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की प्रत्येकजण कोणाची तरी मदत करू या आणि त्याने मदत केली आहे. त्यांने मला खूप काही दिलं आहे. पण यावेळी तिला सलमान खानची मदत घ्यायची नाही कारण तिला मदतीच्या बदल्यात माझ्याकडून काही घ्यायचं नव्हतं आणि मी कोणाचेही उपकार घेऊ शकत नाही.